पुण्यातील अनिकेत सेवा भावी संस्था ही मतिमंद मुलांसाठी काम करत असून मा. कल्पना वरपे ह्या संस्थेतील सर्व कार्यभार सांभाळतात. हे 50ते 60मुलांचे एकत्र संकुल आहे.दिवाळी चा सण आला म्हणल्यावर आपल्या गरजा भागवण्यासाठी व मुलांमध्ये व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी अनेक उपक्रम संस्था राबवतात.
ह्यात दिवाळी निमित्त रांगोळी, विविध प्रकारच्या व रंगाच्या पणत्या, निर्मल्यापासून बनवलेल्या अगरबत्ती, कागदी द्रोण, रंगीत डिजाईन मेनबत्ती कागदी पिशवी व पणत्या ही मुलं स्वतः तयार करून विकतात. ह्याच विक्री च्या जोरावर त्यांनी घोटावडा फाटा येथे 3मजली सर्वांसाठी घर बांधले. त्यांच्या कार्यास आमचा सर्वांचा सलाम व त्यांचे उत्पादन वस्तू घेण्यासाठी 9921187127हा नं वर अवश्य संपर्क साधून मुलांच्या चेहऱ्यावर अधिक हासू फुलवण्याचे आवाहन अनिकेत सेवाभावी संस्था करीत आहे. ही सर्व माहिती सामाजिक बहुउदेशीय संस्था व कला रंजन न्यूज प्रतिनिधी सायली बाळू ढेबे यांनी दिली.