आरोग्य क्रीडा सामाजिक

कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा ची विजयाची परंपरा कायम 

श्रीराम शिक्षण संस्था धामणगाव रेल्वे द्वारा संचालित कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा आयोजित आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सलग चौथ्यांदा चॅम्पियनशिप प्राप्त करून विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. या स्पर्धेमध्ये बीए भाग 1 चा विद्यार्थी अनुराग मौर्या यांनी 55 किलो वजन गटातून सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच बीए भाग १चा विद्यार्थी कार्तिक मिश्रा यांनी 67 किलो वजन गटातून सुवर्णपदक प्राप्त केले.

महाविद्यालयाने सलग चौथ्यांदा चॅम्पियनशिप प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुण अळसड, सचिव घनश्याम मेश्राम, संचालक सुरेश मुंधडा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील आखरे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. उमेश राठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Related posts

शिर्डीत रंगणार भव्यदिव्य पुरस्कार सोहळा “साई गुणगौरव समाज भूषण पुरस्कार 2025”

kalaranjan news

कांदिवली मध्ये धनगर समाज विकास मंडळाची वार्षिक सभा संपन्न.

kalaranjan news

पद्मिनी फाऊंडेशनद्वारे महिला सक्षमीकरणावर केंद्रित एक समुदाय आधारित कार्यक्रम संपन्न 

kalaranjan news