कला जनजागृती लेख शैक्षणिक सामाजिक साहित्यिक

लेख-शिक्षक झाला दीन

देश हा शाळेमध्ये घडत असतो. देशाचा विकास शाळेच्या रस्त्यातून जातो. शाळेत जे मिळतं,ते देशाला मिळत असतं आणि गेली अनेक दशकापासून हा रस्ता आपण चुकलेला आहोत .याचं भान अजून आपल्याला आलेले नाही. किंवा तो रस्ता चुकलेला समजून घेण्याची आपल्याला मनामध्ये इच्छा नाही. देशाला प्रगती करायचे असेल तर शाळेचे वैभव वाढवल्याशिवाय आणि ते वैभव वाढवण्याचे काम आपण करत नाही.देवालय बांधण्यापेक्षा.. विद्यालय सुंदर बांधा. शाळांच्या अस्तित्व आणि विज्ञानाचा अस्तित्व आणि ज्ञानाचा अस्तित्व आपण संपवायला निघालेला आहोत.

 जो शाळेचा आत्मा आहे .तो म्हणजे शिक्षक..! त्याची अवस्था अक्षरशः भिकाऱ्याच्या वर करून ठेवली आहे.आणि ज्याचे अस्तित्वच अनेक संस्थाचालकांनी आणि शिक्षण तज्ञांनी आणि सरकारनी संपून टाकलेली आहे. त्याला दीन करून टाकले आहे. ज्याच्या अस्तित्वावर देशाची प्रगती अवलंबून आहे. तेच अस्तित्वत आपण नष्ट करायला निघालेलो आहोत. त्यामुळे येणाऱ्या पिढ्या ह्या उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. यानिमित्ताने मी स्पष्ट मत व्यक्त करतो. 

ज्या शिक्षकांना आजही पुरेसा पगार आपण देऊ शकत नाही. ज्या शिक्षकांना आपण विचाराचं स्वातंत्र्य देऊ शकत नाही. ज्या शिक्षकांचं अस्तित्व संपवायला आपण निघालेला आहोत. तर पुढे देशाचे अस्तित्व व पिढ्यांचा झअस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही. आपण अनेक क्षेत्रात जरी प्रगती केली असली .किंवा प्रगती कडे जात असलो तरी ..जो पाया आहे 

तो आपण का विसरलो आहे.. याचं मला खरं कळत नाही.ज्याच्या अस्तित्वावर पूर्ण कुटुंब आणि समाज आणि राज्य देश हा उभा असतो. त्यालाच आपण संपवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे कार तज्ञांना अजून कळलं नाही. कितीतरी दिवस ही पिढी आदर्शमय आणि संस्कार पिढी घडविण्याचे काम करत आहे.आपण आज शिक्षकाच्या स्वातंत्र्याला मुकलो आहोत. देशाचा मजबूत पाया हा शिक्षक बनवत असतो.

कुटुंबाचा पाया भक्कम करण्याचे काम शिक्षक करत असतो. समाजाची घडी बसवायचं काम शिक्षक करत असतो. काही निवडक कायमस्वरूपी शिक्षकांचा विषय जरी बाजूला ठेवला.. तरी अनेक शिक्षकांना आज सुद्धा पोटाला पुरेल एवढा पगार आपण देऊ शकत नाही. त्यांचं एखाद्या गुलामासारखं शोषण करत आहोत .याची जाणीव आपल्या राज्यकर्त्यांना का नाही. कोणत्या तरी मूर्ख राजकारणी माणसानं कॉन्ट्रॅक्ट बेसिक वर शिक्षक भरतीचा फ्याड आणलं.. कारण स्वतःला त्याला अक्कल नसल्यामुळे त्याने हे कामगार पद्धतीचे शिक्षकांचं जीवन उध्वस्त करणारे टेंडर आणलं.. विचार आणले आणि त्यांनी येणारी पिढी उध्वस्त करून टाकली.

म्हणून आपल्या देशात जेव्हा शिक्षकतज्ञ, विचारवंत, उच्चशिक्षित हा शिक्षण मंत्री होईल. तेव्हाच शिक्षणाचं वाटोळं थांबेल असं मला वाटतं.

आजच्या स्थितीला शिक्षकाला जगण्याला लागणार आवश्यक मानधन सुद्धा आपण देऊ शकत नाही. यासारखी या देशाची काय शोकांतिका असू शकते.हे आपल्याला कधी कळणार आहे. इथं मजुरीवर जाणाऱ्या माणसाला सुद्धा दिवसाला सातशे ते आठशे हजार रुपये मिळतात. आणि शिक्षकाला दिवसाला फक्त पन्नास ते शंभर रुपये मिळतात .यासारखं दुर्दैव या शिक्षण क्षेत्राचे कोणते असावं. ही विचार करण्याची वेळ आलेली आहे. वेळेत सावध व्हा ..नाहीतर येणाऱ्या पिढ्या या उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षकाचे जीवन उध्वस्त करणाऱ्या योजना सगळ्या बंद करा.. आणि वेळेवर पूर्ण वेतन देऊन त्याच्या मानसिकतेचा विचार करून.. त्याच्या कुटुंबाचा विचार करून शिक्षकाला पूर्णपणे स्वातंत्र्य (फ्रीडम) द्यावं .. या देशाला घडवणारी पिढी ही स्वतंत्र विचारसरणीची घडावी. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

अनेक मेरिट चे आणि उच्च शिक्षित शिक्षक आज बँकांमध्ये ,पतसंस्थांमध्ये, ऑफिसेस मध्ये काम करतात. यासारख्या देशाचं दुर्भाग्य कोणत असावं. जो शिक्षक पोट तिडके ने शिकवतो. जो दिवस-रात्र आपला कुटुंबाचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या विश्वामध्ये रमून त्यांचं भावविश्व फुलवण्याचा प्रयत्न करतो .अशा शिक्षकांच्या वाट्याला एवढी पदरी निराशा येणे. हे खूप वाईट आहे. शिक्षकाचा दिन आपण साजरा करतो. परंतु मला वाटतं शिक्षक हा दीन झाला आहे .अर्थात गरीब झाला आहे.

अनेक विचारवंतांची बुद्धी येथे बंद झालेली दिसत आहे. कारण विचारवंतच घडत नाहीत. त्यामुळे येणारा काळ हा खूप भयानक आहे. याची मात्र जाणीव आपल्याला आहे का नाही ..माहित नाही ?परंतु ती विचार करण्याची वेळ आली आहे .शिक्षकाचे स्वातंत्र्य, शिक्षकाचे आर्थिक स्थैर्य आणि मानसिक स्वास्थ्य आबादित राहण्यासाठी आपण सर्वांनी विचार करावा .अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मी व्यक्त करतो.

शिक्षणतज्ञ

प्रा. राजेंद्र सोनवणे

कवी वादळकार ,पुणे

Related posts

पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या ४६ व्या वार्षिक सभेत ” हेलपाटा ” कादंबरीचा सन्मान

kalaranjan news

पंढरपूर येथील धनगर समाजाच्या उपोषणा कडे धनगर नेत्यांनीच फिरविली पाठ.

kalaranjan news

सम्राट प्रसेनजित समाज विकास संस्थेद्वारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती थाटात साजरी

kalaranjan news