सामाजिक सांस्कृतिक

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ३८ वा विचारमंथन मेळावा संपन्न

स्वायत्त संस्था आणि न्यायालयीन क्षेत्रामध्ये सोईच्या राजकारणासाठी अनैतिक हस्तक्षेप आणि कोरोनापासून तर धार्मिक धुर्विकरणातून समाजाला सतत भयग्रस्त करून वैचारिक दडपशाहीचे सरकारचे प्रयत्न आहेत. अनेक फुकटच्या योजना आणि भांडवलदारांना झुकते माप देऊन आर्थिक संकटातून सर्वसामान्न्य देश आणि महाराष्ट्र राज्याला नागवं करण्याची अव्यवहार्य वाटचाल हाच सत्तेतल्या नेत्यांचा राजकीय परिचय आहे. असे प्रखर वास्तवतादर्शी मत दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक व ईलना राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी व्यक्त केले. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या ३८ व्या मासिक विचारमंथन मेळाव्यात ते अध्यक्ष व सत्कारमुर्ती म्हणून उपस्थित होते. इंडीयन लॕंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) या देशातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या संपादक- प्रकाशकांच्या संघटनेत राष्ट्रीय अध्यक्षपदावरील निवडीने महाराष्ट्र आणि विदर्भाला या प्राप्त बहूमानाबध्दल त्यांचा लोकस्वातंत्र्यकडून स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व भारतीय संविधान पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.लोकस्वातंत्र्यचे संस्थापक – राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख, उपाध्यक्ष प्रदिप खाडे, विदर्भ संघटक डॉ. शंकरराव सांगळे व कस्तूरी ट्रस्ट सदस्य, समाजसेवक वसंत देशमुख (नारखेडकर) यांची विचारमंचावर यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबध्दल वसंत देशमुख यांचा सुध्दा सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येऊन ईतरांचे ही स्वागतं करण्यात आली.

यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांना वंदन अभिनंदन करण्यात आले. देशातील शहिद जवान, लैंगिक अत्त्याचारात बळी गेलेल्या भगिनी, आत्महत्त्याग्रस्त शेतकरी नैसर्गिक आपत्तीग्रस्त व अपघातातील बळींना श्रध्दांजली देण्यात आली. लोकस्वातंत्र्य ग्रामीण जिल्हाध्यक्ष सागर लोडम यांच्या पर्यावरणावर काढलेल्या वऱ्हाड वृत्त दिपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले. त्याचप्रमाणे संघटनेकडून उपलब्ध करण्यात आलेल्या भारतीय संविधान या पुस्तकांचे व सभासद ओळखपत्रांचे उपस्थित सभासदांना याप्रसंगी वितरण करण्यात आले. अकोला जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांनी तयार केलेल्या नव्या कार्यकारिणीचे वाचन करून ती घोषित केली. पत्रकार हा छोटा असो वा मोठा त्याने समाजहितासाठी निवडलेले लिखाणाचे विषय हे महत्वाचे असतात असे सांगून वऱ्हाडवृत्तच्या दिपोत्सव पर्यावरण विशेषांचे व संपादक सागर लोडम यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. संजय देशमुख यांनी प्रास्ताविकातून दिवाळी शुभेच्छा देत संघटनेचा आढावा व आगामी विधानसभेत अचुक मतदानातून योग्य उमेदवार निवडण्याचे आवाहन याप्रसंगी केले. सचिव राजेन्द्र देशमुख व उपस्थितांनी मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय सचिव राजेन्द्र देशमुख, राष्ट्रीय पदाधिकारी पुष्पराज गावंडे, ॲडराजेश जाधव, डॉ. विनय दांदळे, सुरेश पाचकवडे, के‌. एम. देशमुख, पंजाबराव वर, सागर लोडम, प्रा‌. विजय काटे, के. व्ही. देशमुख, शाम देशमुख, प्रा. मनोज देशमुख, सोनल अग्रवाल, विठ्ठल देशमुख, नानासाहेब देशमुख, अनंतराव महल्ले, सुरेश तिडके, अनंतराव देशमुख, अॕड.संकेत देशमुख, दिलीप नवले, सतिश देशमुख (निंबेकर), विजय देशमुख, अशोककुमार पंड्या, धारेराव देशमुख, संघपाल सिरसाट, दिपक सिरसाट, बुढण गाडेकर, डॉ. अशोक सिरसाट, गौरव देशमुख, पि.एन.जामोदे, अविनाश भगत, कृष्णा चव्हाण, दिपक शर्मा, आकाश हरणे, गजानन हरणे, अथर्व देशमुख, सर्वेश महल्ले, अॕड. प्रजानंद उपर्वट प्रकाश जंजाळ, शिवचरण डोंगरे, देवराव परघरमोर, संघपाल सिरसाट, गजानन चव्हाण व ईतर पत्रकार सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांनी तर आभारप्रदर्शन संघटना राष्ट्रीय पदाधिकारी पुष्पराज गावंडे यांनी केले.सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related posts

बोरीवली येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या महाभंडाराचे आयोजन

kalaranjan news

रत्नागिरीची कन्या ‘सोनाली जाधव’ने पटकावला मिस मद्रासी नॉर्थ इंडिया २०२५ चा ‘किताब’

kalaranjan news

वसुंधरा संस्थेच्या नाशिक स्किल हबच्या विद्यार्थ्यांची स्टेट बँकेत क्षेत्र भेट

kalaranjan news