कडाडला ढोल ताशा,
थरार ताशाचा थिरकला
गगनभेदी त्या ढोल ताशे,
कंपायमान गगनालाही थरथरविला
येतोय बाप्पा माझा !
खण खण खणकली लेझीम
अन झांजा झांजा निनादिली
थकने बिकने विसरलो आता
उत्साह संचरला आसमंताला
येतोय बाप्पा माझा !
आसमंत लाल गुलाली
अन सर्वांग माझं गुलाले माखले
फुटले नवे धुमारे आज,
सुचले पदन्यास नवे
येतोय बाप्पा माझा !
पदन्यासे जर अडखळलो जरासा
पाय पायी घुटमळले जरा जरासे
नासिका तू सुंघून
नको नको ते मनी तू दुःशंकू नको,
येतोय बाप्पा माझा !
धुंदीत धुंद आहेच मदमस्त,
बाप्पाच्या मी मस्तीत
केली नशा मोरया मोरया,
तल्लीन मी माझ्या बाप्पातं,
येतोय बाप्पा माझा !
पंच महाभूते स्वागता सजली,
पंच खाद्य नैवेध्या ठेवियेला
पंच मुखाने मोरया मोरया चा,
गगनभेदी नाद कराया घेतला,
येतोय बाप्पा माझा !
भस्मासूर महागाईचा झालाय,
होऊ दे न्हाई घाबरत महागाईला
भाकर ठेचा खाईन पण देईन,
मोदक ताटी बाप्पाला
येतोय बाप्पा माझा !
सुखकर्ता नि दुखहर्ता तू,
करी निर्भय निश्चित आम्हांला तू
तसाच भयहर्ता हो,
नको दाखवू तू दुःस्वप्नांना तू
येतोय बाप्पा माझा !
सताड उघडली दारं खिडक्या,
आगमना आले सर्व रस्त्याला
तुडुंब भरला रस्तो न रस्ता,
गर्दीची तमा नाही आम्हाला
येतोय बाप्पा माझा !
घुसमटल्या गर्दी श्वास घुसमटला
खांदा घासुनी वाट काढिली
ह्याच गर्दीत,आज मजला
बाप्पा माझा दिसू लागला
येतोय बाप्पा माझा !
तूझा मोरया अन माझाही मोरया,
नाद त्रिलोकी घुमून गेला
बाप्पा बाप्पा मोरया अन,
खंड नाही मोरया म्हणतांना,
येतोय बाप्पा माझा !
गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ती मोरया
येतोय आज बाप्पा माझा घरा,
स्वागत दणक्यात होऊ दे !
येतोय ! येतोय! येतोय ! येतोय
*बाप्पा माझा,स्वागत दणक्यात होऊ दे !*
कवी – राजा जोशी
9823687519