दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी रोझरी महाविद्यालयात हिंदी काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उद्दिष्ट हिंदी भाषेची जागरूकता वाढवणे, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाला चालना देणे हे होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मूळ काव्य लेखन करून आपली लेखन क्षमता सिद्ध केली. विविध विषयांवर भावपूर्ण कविता सादर करून त्यांनी आपल्या भावना, अनुभव आणि कल्पनाशक्ती व्यक्त केली. या स्पर्धेचे आयोजन एनटिसी एड्युकॅअर ‘नवचैतन्य’ समूह सदस्या प्राध्यापक वर्षा प्रभुगांवकर आणि प्राध्यापक सिद्धि शिरोडकर यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महेश बाहेती यांनी आणि विशेष अतिथी म्हणून रोझरी महाविद्यालयाचे प्राध्यापक फादर रोमन यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचे भव्य उद्घाटन केले. या स्पर्धेत सुमारे ३४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विजेता म्हणून प्रथम क्रमांक कल्पना सुनके ला मिळाला दुसरा क्रमांक किस्मत चौहान आणि सानिया शेख ला मिळाला तसाच तिसरा क्रमांक शबीना डंबल ला मिळाला आणि चौथा क्रमांक क्रेसिल्ड डिकोस्टा आणि कविता चौधरी ला मिळाला.
द्वितीय वर्ष विद्यार्थी दिलायला हिने या कार्यक्रमाचे आभार मानले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेची आवड निर्माण झाली असून त्यातून अनेक प्रतिभावंत कवी तयार होतील,अशी अपेक्षा आहे.