पुण्यात अरिंजय फाउंडेशन गोमाता गाईंसाठी आपले बहुमोलाचे कार्य बजावत आहे. सत्य स्थितीत याच गायींच्या जनावरांच्या हस्तेमुळे, कत्तलीमुळे समाजात वाईट प्रवृत्तीचा वेग वाढत आहे. याच गोमातांना एकीकडे मातेसमान वागणुकीचा दर्जा देताना दुसरीकडे समाजातील या वाईट नकारात्मक गोष्टींना तोंड द्यावे लागते. अशा संकल्पनेतून व विचारातून अरींजय फाउंडेशन संचलित वसुंधरा गो संवर्धन केंद्र स्थापित करत आहे. सर्व संस्था व समाजातील प्रत्येक माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
अरिंजय फाउंडेशन प्रस्तावित वसुंधरा गो संवर्धन केंद्र भूमिपूजन सोहळा हा गोवस्त द्वादशी, वसुबारस या पुण्यतिथी सोमवार दि. २८आक्टोबर २०२४ रोजी स. १०ते सायं. ४वाजेपर्यंत हा गो शाळेचा भूमिपूजनाचा सोहळा पार पडत आहे. सर्व गौरक्षकांनी व मान्यवर इतर इच्छुक मंडळींनी उपस्थित राहण्याचे आवाहन अरिंजय फाउंडेशन करीत आहे. हा सोहळा मांदळवाडी वाफगाव, ता. खेड, जि. पुणे येथे संपन्न होणार असून श्री. बबन माने, श्री. विकास माने, सौ. विद्या माने, श्री. अभिषेक माने, श्री. धनंजय माने यांच्या शुभहस्ते करण्यात येईल. ह्या वसुंधरा गो संवर्धन केंद्रास त्यांच्या कार्य वाटचालीस शुभेच्छा देत अरिंजय फाउंडेशन अध्यक्ष मा. मयूर ज्ञानेश्वर भगत आपल्या भावी कार्यास कलारंजन न्यूज कडून शुभेच्छा देते. ही सर्व माहिती सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित कलारंजन न्यूज प्रतिनिधी सायली बाळू ढेबे यांनी घेतली.