उद्योग शैक्षणिक सामाजिक

नाहीरे वर्गातील महिलांसाठी आणिक फायनान्शिअल सर्व्हिसेसचं कार्य गतिमान

आज अनिक फायनान्शिअल सर्विसेस आणि सावित्रीबाई फुले म्युचल बेनिफिट ट्रस्ट उमरगा या नवीन शाखेच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी ते विचार पिठावरून बोलत होते.या कार्यालय उद्घाटनच्या प्रसंग आणिक चेअरमन रमेश भिसे,उपाध्यक्ष बी.पी. सूर्यवंशी,प्रभात मल्टीस्टेटचे संचालक एम.डी पाटील सर,हनुमान नागरी ग्रामीण बिगर शेतीसह सहकारी पतसंस्था मर्यादित मातोळा चे संचालक नानाराव भोसले, प्राचार्य अनिगुंठे सर, प्राचार्य बिराजदार सर, समाज विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विद्याताई वाघ ,पर्याय संस्थेच्या संचालिका अनिता ताई तोडकर, समाज विकास संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ, डॉक्टर कल्पना वाघ आदी मान्यवर आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.

 पुढे विश्वनाथ (अण्णा) तोडकर बोलत असताना ते म्हणाले कॅशलेस व्हॉइसलीस,आणि क्रेडिट लेस अशा शेवटच्या उपेक्षित,महिलांच्या विकासासाठी आणिक फायनान्शिअल सर्व्हिसेस गेली बारा वर्षापासून कार्यरत आहे. भविष्य काळामध्ये आपल्याच गावातला पैसा आपल्याच लोकांच्या विकासासाठी कामी आणावा. यातून गरिबांच्या विकासाला मदत होईल.आणि आपणासही चांगल्या पद्धतीचा व्याजदर मिळेल. त्यातून सामाजिक बदलासाठी आपला हातभार लागेल असे प्रतिपादन त्यांनी केले.

 या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रोफेसर गोविंद बिराजदार सर होते, यावेळी भूमिपुत्र वाघ, वेंकट अणिगुंटे,रमेश भिसे बीपी सूर्यवंशी,यांनी आपले विचार व्यक्त केले, याप्रसंगी ठेवीधारक आणि लाभधारक यांचा सत्कार करण्यात आला,या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाखा व्यवस्थापक निखिलराजे वाघ यांनी केले तर सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले,कार्यक्रम आयोजनासाठी विद्या मारकड,अफसाना मुल्ला,उमेश आबाचणे, संकेत लवटे,सोम अंतडं ,मैलारी शिरोळे,आनंद गायकवाड,नितीन वाकळे,आकाश इंगळे अर्जव चौधरी,गोविंद कामले,रंजना यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला गुड मॉर्निंग वॉकचे विशेष प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Related posts

शिवनेरी किल्ल्यावर माझा शिवबा काव्यसंग्रह प्रकाशन व काव्य मैफल उत्साहात संपन्न

kalaranjan news

पवित्रता, जीवन की बनाये रखना यही धम्म है!

kalaranjan news

स्कुल ऑफ स्कॉलर्स बीर्ला कॉलनी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

kalaranjan news