कोथरूड, पुणे
श्री खंडेराय प्रतिष्ठान बालेवाडी पुणे,४५ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. गणपत राव तथा आप्पासाहेब बालवडकर यांचा शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘भारत सम्मान’ पुरस्कार इंडियन हेरिटेज आणि हेल्थकेअर सेंटर यांच्या वतीने नवी दिल्ली येथे इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे जस्टीस मनमोहन सिंग, भारताचे माजी परराष्ट्रमंत्री, व्यवहार मंत्री सलमान खुर्शीद, आयकर महासंचालक नासिर अली, तसेच आय. आर. एस. श्री नय्यर अली यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
हेच औचित्य साधून राजा श्री शिवराय प्रतिष्ठान संस्था कोथरूड, पुणे या संस्थेच्या वतीने मा. गणपतराव तथा आप्पासाहेब बालवडकर यांचे अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. सागर बालवडकर यांचे ही अभिनंदन व सन्मान करण्यात आला.
मा. कृषिमंत्री शशिकांत भाऊ सुतार साहेब यांच्या शुभहस्ते आप्पासाहेबांचा सन्मान करण्यात आला. तसेच श्री खंडेराय प्रतिष्ठान संस्थेची धुरा उत्तम आणि समर्थपणे सांभाळत असल्यामुळे राजा श्री शिवराय प्रतिष्ठान संस्थेचे सचिव मा. सागर बालवडकर साहेब, मान्यवर संचालक, पदाधिकारी, प्राचार्य आणि अध्यापक वृंद उपस्थित होते.
आभार प्रदर्शन मा. मुख्याध्यापिका संध्याताई देशपांडे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय डॉ. शांताराम डफळ तर सूत्रसंचालन अजित वाराणसीवार यांनी केले. तसेच न्यू इंडिया स्कूल च्या प्रिन्सिपल पूर्वा मॅडम यांनी उपस्थितांचे स्वागत केले.