आपल्या सर्वांचे आवडते अभिनेते अतुल परचुरे मराठी रंगभूमीवरचे आवडते कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपली अभिनयाची छाप. बुलंद आवाज, व्यक्तिमत्व , अजरामर सिनेमा, नाटक,मालिका या माध्यमातून आपल्या चाहत्यांना त्यांनी जवळ केले. त्यांना कर्करोग हा आजार असून त्यांनी या आजारावर मात करत आपले काम या रंगमंचावरील प्रेम त्यांनी सुरू ठेवले होते. आत्ता नुकतीच घोषणा झाली आणि त्यांनी पुन्हा सूर्याची पिल्ले या नाटकाद्वारे रंगभूमीवर पुन्हा एकदा प्रेक्षकांना अतुल परचुरे बघायला मिळण्याचा हा आनंद मिळणार आणि तोच अचानक रंगभूमी सुनी करून गेला. त्यांना पुन्हा त्रास होतोय असं म्हणत ऍडमिट केलं पुन्हा परत बरे होऊन येण्याची आशा ती शेवटी आशाच राहिली… मराठी ह्या कला विश्वातील आज अतुल परचुरे नावाचा अनमोल हिरा आपल्यातून नाहीसा झाल्याची खंत सर्वांनाच राहील.