प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांचे वतीने मुंबई वांद्रा पश्चिम येथे २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता विविध क्षेत्रतील मानवरांना प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी बाळासाहेब तोरस्कर यांनी भूषवले ‘ उद्घाटक साहित्यिक आणि उपाध्यक्ष सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य डॉ. खं . रं . माळवे खरमा . मुंबई यांच्या हस्ते करण्यात येणार आले . बी. पी . ई . हायस्कूल बान्द्रा या मुलींनी स्वागत गीत सादर केले . स्वागताध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक वर्ल्ड व्हिजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा नागेश हुलवळे मुंबई यांनी आपल्या देशाच्या संविधानाच्या उद्देशिका वाचन केले आणि त्यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले . आयोजकांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला .
यावेळी प्रमुख उपस्थिती पद्मश्री डॉ डी .जी यादव डॉ डेरिक एंजल्स ‘ डॉ सुकृत खांडेकर ‘ श्री भानुदास केसरे ‘ प्रमोद महाडीक ‘ रामकृष्ण कोळवणकर ‘ राजीव कांबळे , डॉ गॅन्सी अल्बुकर्क आदि मान्यवर उपस्थितीत होते . यावेळी नवोदित कविंच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले . तसेच या कार्यक्रमात साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक , पत्रकारिता, संपादकीय,, ‘ वैद्यकीय, कला , नाटय , नवोदित अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८७ हून अधिक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
अक्षरश्री विलास देवळेकर यांनी नावावरुन कविता फ्लॅक्सने, पुरस्कार्थींचे लक्ष वेधून घेत होते. आणि बऱ्याच जणांनी त्या कवितेसोबत फोटोही काढले. त्यामुळे कार्यक्रमाची शोभा ही वाढली. या कार्यकमाचे आयोजन नॅशनल लायब्ररी ‘ पी .बी ई सोसायटी नाईट शाळा ‘ वर्ल्ड व्हिजन संस्था , लेखक रमेश पाटील ‘ प्रमोद सुर्यवंशी योगेश हरणे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले होते . योगिता पाखले,योगेश गोतरणे, वैशाली पाखले यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले .